
KISAN CREDIT CARD
किसान क्रेडिट कार्ड चा परिचय :-
KISAN CREDIT CARD ही योजना भारत सरकारने सुरु केली आहे. जिचा उद्देश शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज सहज उपलब्ध करुं देणे हा आहे. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती विषयक गरजा भागवण्यासाठी व स्वस्त दरात कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड दिले जाते. ही योजना नाबार्ड च्या मार्गदर्शन खाली चालवकी जाते. आणी राष्ट्रीय कृत बँक, प्रादेशिक बँका व ग्रामीण बँका यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. या योजनवचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, त्यांना पीक कर्ज, शेती शी संबंशित उपकारणे, बी बियाणे, पशुपालन, मत्स्य पालन, या सारख्या विविध शेती पुरक व्यवसायासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देणे हा आहे.
किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून ठराविक मर्यादा पर्यंत कर्ज दिले जाते. आणी ते ठराविक मर्यादा पर्यंत कर्ज दिले जाते. आणी परतफेड करण्यासाठी ठरावीक कळवधी दिला जातो. हे कर्ज अल्प व्याज दारावर दिले जाते. आणी शेतकरी वेळेवर परतफेड केल्यास त्यांना व्याजदरात सवलत दिली जाते.
किसान क्रेडिट कार्ड ची उद्दिष्टे :-
1. शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करणे :-
- शेती साठी लागणारे भांडवल मिळावे यासाठी किसान क्रेडिट कार्ड मदत करते.
- बियाणे, खत, कीटकनाशके, आणी सिंचन साठी भांडवल ची गरज असते.
- शेतकरांना बँक मधून सहज कर्ज मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- सावकारांच्या जाळ्यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ही योजना मदत करते.
- विनतारण कर्ज उपलब्ध करून शेतकऱ्यांना मदत करण्यात हातभार लावला जातो.
- देशाच्या कृषी उत्पादनत वाढ करण्यासाठी ही योजना उपलब्ध आहे.
- शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त इतर कामासाठी देखील हे कर्ज उपलब्ध होऊ शकते.
2. शेती साठी सहज आणी किफायतशीर कर्ज उपलब्ध करणे.
- परंपरिक पद्धत वर अवलंबून राहण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञान चा अवलंब करणे महत्वाचे आहे.
- ट्रॅव्हटर, नवीन यंत्र खरेदी करण्यासाठी कर्ज दिले जाते.
- सरकारी अनुनदान मुले शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो.
- शेतकऱ्यांना आवश्यक तेवढ्या रकमेत आणी गरजेनुसार कर्ज मिळते.
- आधुनिक बियाणे आणी सुधारित तंत्रज्ञान चा वापार करणे सोपे होते.
- कृषी उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणात कार्य करते.
- बँक च्या माध्यमातून अधिकृत आणी सुरक्षित कर्ज व्यवस्था केली जाते.
3. तंत्रज्ञान चा अवलंब करण्यासाठी प्रेरणा देणे :-
- आधुनिक शेती साठी navinn टेकनॉलॉजि चा वापर करणे आवश्यक आहे. जर जुन्या परंपरिक पद्धतीचा वापार करत राहिले जर उत्पादन मर्यादित प्रमाणावर राहील.किसान क्रेडिट कार्ड द्वारे नवीन टेकनॉलॉजि घेण्यासाठी आर्थिक मदत मिळते. आधुनिक पद्धतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो.
- तंत्रज्ञान मुळे नैसर्गिक अँपत्ती मुळे होणारे खर्च कमी होतो. त्यामुळे भारतीय शेती अधिक प्रगत होते.
4. शेती माल साठावण्यासाठी आणी विक्री सुधारण्यासाठी मदत करणे :-
- योग्य गोडाऊन नसल्याने पिके सडतात किव्हा खराब होतात. शेतकऱ्यांना शेती साठी चांगल्या सुविधा मिळत नाहीत.
- या क्रेडिट कार्ड मुळे कोल्ड स्टोरेज आणी गोडाऊन बांधता येतात.
- शेतकरी मालाची विक्री योग्य वेळी आणी योग्य किमतीत करू शकतो.
- प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक भांडवल सहज उपलब्ध होते.
- शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा जास्त फायदा होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माल पोहोचवण्यासाठी संधी मिळते.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळळे जाते.
- एकंदरीत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.
5. ग्रामीण बँकिंग व्यवसतेचा प्रसार करणे :-
- ग्रामीण भागात अजून बँकिंग सुविधा जास्त प्रमाणात पोहोचल्या नाहीत.
- किसान क्रेडिट कार्ड मुळे बँक मधून अधिकृत कर्ज मिळते.
- बँक चे जाळे ग्रामीण भागात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
- या मुळे ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक साक्षरता मिळते. आणी बँक खाते उघडण्याचे प्रमाण वाढते.
- सरकारी योजनाचा लाभ थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतो. त्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्थाचा विकास होतो.
6. ग्रामीण अर्थाव्यवस्था बळकट करणे :-
- भरतातील ग्रामीण अर्थाव्यवसस्था शेती वर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न मध्ये वाढ झाल्यास संपूर्ण ग्रामीण भागाचा विकास होतो. या क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना वित्तीय मदत दिली जाते.
- शेती साठी आवश्यक संसाधने सहज उपलब्ध झाल्याने उत्पादन वाढते.
- कृषी पूरक व्यवसायाला मदत मिळाल्यास रोजगार संधी निर्माण होतात.
- ग्रामीण भागातील लोकांना स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळतो.
7. महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे :-
- महिला शेतकरी देखील शेतीच्या कामात फार मोठा वाटा उचलतात.
- त्यांना स्वतंत्र आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत माहिला साठी विविध योजमा आहेत.
- महिलांना अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- महिलांचे आर्थिक स्वतंत्र वाढल्याने ग्रामीण समाजात परिवर्तन होते.
8. शेतकऱ्यांना आपत्ती काळात मदत करणे :-
- नैसर्गिक अप्पत्ती मुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचे नुकसान होते, पीक नष्ट होते.
- अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर आणी चक्रीवादळ यामुळे नुकसान होते.
- या योजना अंतर्गत आपत्ती निवारण सहाय्यक दिले जाते.
- पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते.
मिशन इंद्रधनुष च्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.
Table of Contents
किसान क्रेडिट कार्ड चे निष्कर्ष :- ही योजना भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणी फायदेशीर योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले भांडवल सुलभ आणी स्वस्त दरात उपलब्ध होते. Ya योजनेमुळे शेतकरी सावकारच्या जाळ्यातून मुक्त होतात. अल्प व्याज दरावर कर्ज मिळाल्याने त्यांना शेती साठी आवश्य्क संसाधने खरेदी करणे सोपे जाते. हे CREDIT CARD केवळ पीक कर्ज पुरते मर्यादित न राहता, पशुपालन, मत्स्यपालन, कुकूटपालन आणी इतर कृषी पूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी मदत करते.
- या मुळे शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढते. आणी ग्रामीण अर्थाव्यवस्था मजबूत होते. या योजनेमुले सीमांत लघु शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच महिला शेतकऱ्यांसाठी विशेष योजना उपलब्ध केल्या आहेत. एकूणवच ही योजना शेतकरी च्या आर्थिक विकासासाठी आणी भारताच्या कृषी क्षेत्राच्या वृद्दी साठी एक प्रभावी साधन ठरली आहे. त्यामुले देशातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेवचा लाभ घ्यावा आणी त्यांच्या शेती व्यवसायात सुधारणा करावी.
किसान क्रेडिट कार्ड वर सतत विचारले जाणारे प्रश्न :-
1. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
- ही भारत सरकारची एक योजना आहे, ही शेतकऱ्यांना शेती विषयक गरजनसाठी अल्प व्याज दरावर कर्ज उपलब्ध करून देते.
2. या क्रेडिट कार्ड कोण कोणत्या बँक मध्ये उपलब्ध आहे?
- राष्ट्रीय बँक, सहकारी बँक, प्रादेशिक बँक, ग्रामीण बँका आणी काही खासगी बँक मधे उपलब्ध आहे.
3. या क्रेडिट कार्ड साठी पात्रता काय आहे ?
- ज्या शेतकरी कडे शेतीयोग्या जमीन आहे, तसेच ते पीक उत्पादन, मत्स्यपालन किव्हा पशु पालन करतात, ते या योजनेसाठी पत्र आहेत.
4. या क्रेडिट कार्ड मुळे किती कर्ज मिळू शकते ?
- शेतकऱ्याच्या शेतीच्या प्रकारनुसार आणी उत्पन्न शामतेनुसार रुपये 10,000 पासून ते रुपये 3 लाख पर्यंत कर्ज मिळू शकते.
5. या क्रेडिट कार्ड वर कोणते कागदपत्रे लागतात ?
- आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतीचे सातबारा उतारा, बँक पासबुक आणी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असते.
6. जर मी कर्ज वेळेवर फेडले नाही तर काय होईल ?
- वेळेवर परतफेड न केल्यास व्याज वाढू शकते आणी क्रेडिट स्कोर खराब होऊ शकते.
7. या क्रेडिट कार्ड साठी हमी दार आवश्यक आहे का ?
- रुपये 1.60 लाख पर्यंत च्या कर्ज साठी हमीदार आवश्यक नसतो, मात्र जास्त रकमेच्या कर्ज साठी बँक हमीदार मागू शकते.
8. ह्या क्रेडिट कार्ड ची वैधता किती असते ?
- या ची साधारणता 5 वर्ष साठी वैध असते, आणी त्याचे नूतनिकरण करता येते.