MAHATMA PHULE JAN AROGYA YOJANA ( ज्योतिबा फुले जन आरोग्या योजना)

MAHATMA PHULE JAN AROGYA YOJANA

JPHULE JAN AROGYA YOJANA चा परिचय :-

MAHATMA PHULE JAN AROGYA YOJANA ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना असून, ती महाराष्ट्रातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरु केली आहे. पूर्वी या योजनेचे नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखलि जाईची पण आता तिचे नाव बदलून mahat, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असे झाले आहे. या योजन अंतर्गत पत्र लाभार्थी ला 5 लाख रुपये पर्यंत मोफत आरोग्य सेवा दिली जाते. ज्यामध्ये कर्करोग, किडनी विकार, नुरोसर्जन, प्रसूतीसेवा, इत्यादी विविध शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो.

राज्यातील शिधा पत्रिका धारक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घाटक, अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ घेता येतो. पात्र लाभार्थी मान्यता प्राप्त हॉस्पिटल मध्ये कोणतेही शुल्क न भरता उपचार घेऊ शकतात. कारण या उपचारांचा खर्च सरकार कडून घेतला जातो. याबयोजनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण आणी ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली असून ही योजना गरीब लोकांसाठी वरदान ठरली आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची उद्दिष्टे :-

1. गरिब आणी गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे :-

  • महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेचा मुख्य उद्देश दुर्बल लोकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
  • अनेक वेळा गरीब लोकांना महागडे उपचार घेणे शक्य नसते, त्यामुळे ही योजना त्या लोकांना आधार ठरली आहे.
  • पूर्ण आरोग्यसेवेचा खर्च सरकार उचलत असल्याने कोणताही खर्च करावा लागत नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही विमा पोलि्सी ची गरज नाही.
  • या योजनेमुळे समाजातील गरीब लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी मदत होते.

2. ग्रामीण भागात वैदिकीय सेवा वाढवणे :-

  • शहरात उपलब्ध असलेलेल्या आधुनिक आरोग्य सेवाचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा मिळावा या साठी सरकार प्रयत्न करत आहे.
  • जास्त करून शेतकरी आणी गरीब लोक हे ग्रामीण भागात राहतात, म्हणून त्यांना आरोग्य सेवा सोपी करणे गरजेचे आहे.
  • ग्रामीण भागातील मान्यता प्राप्त हॉस्पिटल मध्ये या योजनेत उपचार दिले जातात.
  • जिल्हा व तालुका स्तरावरील हॉस्पिटल ला या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
  • टेलिमेडिसिन आणी मोबाईल आरोग्यसेवा केंद्राच्या माध्यमातून ही या सेवा पुरवण्यात येतात.
  • ग्रामीण भागात जन जागृतीसाठी सरकारी मोहीम आणी आरोग्य शिबीरे राबवली जत आहेत.

3. सरकारी आणी खाजगी रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे :-

  • MAHATMA PHULE JAN AROGYA YOJANA या योजनेच्या माध्यमातून अनेक खासगी रुग्णालय या उपक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत.
  • शस्त्रक्रिया, औषधं उपचार, आणी संपूर्ण खर्च शासन उचलते.
  • योजनेतर्गत कार्यरत असलेल्या रुग्णालयामध्ये चांगल्या दर्जाच्या वैदकीय सुविधा उपलब्ध आहेत.
  • उपचारा दरम्यान कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ नये या साठी सरकारने निगराणी यंत्रणा तयार केली आहे.
  • या योजना अंतर्गत जास्तीत जास्त रुग्णाल्यांना समाविष्ट केरून आरोग्य सेवा विस्तृत केली जात आहे.

4. वृद्ध आणी निराधार नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करणे :-

  • वयोमानानुसार वृद्धांना विविध आजार होण्याची शक्यता असते, जसे कि सांधे दुःखी, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी.
  • अशा रुग्णांना योग्य उपचार मिळावे आणी आर्थिक अडचणीमुळे आरोग्य सेवनपासून वंचित राहू नये, यासारथी ही योजना मदत करते.
  • वृद्धांना विशेषतः घरच्या जवळच्या हॉस्पिटल मध्ये सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो.
  • वृद्धांना रुग्णालयात भरती होण्यासाठी विशेष सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
  • त्यामुळे महाराष्ट्रातील वृद्ध लोकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

5. अपघात ग्रस्त नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा पुरवणे :-

  • अपघात झाला तर रुग्णाला त्वरित सेवा मिळाली नाही तर त्याचा जीव जाण्याची शक्यता अधिक असते.
  • या योजनेमध्ये अपघात ग्रस्त रुग्णांना आपत्कालीन सेवा विना मूल्य दिली जाते.
  • यात वेगाने प्रक्रिया सुरु करून रुग्णाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.
  • काही गंभीर अपघातात रुग्णाला कृत्रिम अवयव बसवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
  • राज्यभरातील काही निवडलेण्या हॉस्पिटल मध्ये ही सुविधा मिळते.
  • यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना मदत मिळवून त्यांचे ओझे कमी होण्यासाठी मदत होते.

6. हृदय रोग, मूत्रपिंड, कर्करोग या सारख्या गंभीर आजारावर मोफत उपचार देणे :-

  • या आजारानवरील उपचार अत्यंत महागडे असतात आणी गरीब लोकांना ते परवडत नाहीत, त्यामुले जा योजनेमध्ये मोफत सुविधा दिली जाते.
  • मूत्रपिंड ट्रान्सप्लांट साठी औषधंसाठी लागणारा सर्व खर्च सरकार उचलते.
  • ही ससेवा मोफत असल्यामुळे गरीब आणी मध्यम वर्गीय लोकांना ह्याचा फायदा झाला आहे.

7. नवजात बाळासाठी आरोग्य सेवा उपलब्ध करणे :-

  • जन्मात काही गंभीर विकार किव्हा त्रुटी असलेल्या नवजात बाळांना उपचार मिळावेत या साठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
  • या योजनेमुळे अशा बाळांवर मोफत शस्त्रक्रिया आणी उपचार केले जातात.
  • सरकारी व खासगी मान्यताप्राप्त हॉस्पिटल मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
  • नवजात बाळंच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक सेवा आहेत त्या मोफत दिल्या जातात.
  • या मुळे बाळांचे मृत्यू दर कमी करण्यासाठी मदत होते.
  • गरीब कुटुंबाला या योजनेचा सर्वात जास्त फायदा होत आहे कारण लहान बाळांचा खर्च जास्त फायदा होतो.

8. महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे :-

  • या योजनेमध्ये स्त्रिया मध्ये प्रसूती दरम्यान होणारे गुंता गुंतीचे प्रसंग टाळण्यासाठी मोफत शस्त्रक्रिया आणी उपचार दिले जातात.
  • स्त्री रोग तज्ज्ञच्या सल्याने योग्य उपचार आणी निदनाची सुविधा देण्यात आली आहे.
  • ग्रामीण आणी गरीब कुटुंबातील स्त्रियांना ही योजना फायदेशीर आहे.
  • बाळाच्या आरोग्यासाठी आणी प्रसूती नंतरच्या काळजी साठी ही योजना कार्य करते.
  • याबयोजनेमुळे महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहे.

9. शेतकरी आणी असंघटित कामगारांना आरोग्य सेवा प्रदान करणे :-

  • जास्त करून शेतकरी दुर्बल असून महागड्या उपचाराचा खर्च उचजकाऊ शकत नाहीत.
  • महात्मा ज्योरीराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत त्यांना मोफत आरोग्य सेवा दडीली जाते.
  • मजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या रोजगाराच्या स्वरुपात होणाऱ्या आजावर देखिल मोफत उपकचार मिळतात.
  • या मुळे आरोग्याच्या समस्या मुळे त्यांचे जीवनमान सुधारेल याची खात्री मिळते.

ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया :-

1. पात्रता तपासणी :-

  • अन्न सुरक्षा योजने अंतर्गत शिधा पत्रिका असलेले कुटुंब, शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार, आणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घाटक या योजनेसाठी पात्र असतात.
  • आणी सर्वात महत्वाचे म्हणजे लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

2. आवश्यक कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र

3. अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑफलाईन पद्धतीसाठी लाभार्थी जवळच्या आरोग्य सुविधा केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय, किव्हा मान्यता प्राप्त रुग्णालयात जाऊन अर्ज करू शकतो.
  • आणी ऑनलाईन पद्धती साठी https://www.jeevandayee.gov.in या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरू शकतो.

4. महात्मा फुले जन आरोग्य कार्ड मिळवणे :-

  • अर्ज मंजूर झाल्या नंतर लाभार्थी ला महात्मा फुले जन आरोग्य कार्ड दिले जाते.
  • हे कार्ड दाखवून लाभार्थी मोफत उपचार घेऊ शकतात.

Table of Contents

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे निष्कर्ष :-

  • सरकारच्या या योजनेमुळे महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य क्षेत्रात मोठी सुधारणा झाली आहे. गरिबांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्यास मदत झाली असून, अनेक कुटुंबाचे आयुष्य वाचवले आहे. या मुळे ही योजने गरीब लोकांसाठी संजीवनी ठरली आहे. विशेषत या योजनेमुले शेतकरी, ग्रामीण भागातील लोक, गरीब लोक, आर्थिक दृष्ट्या गरीब लोक यांना या योजनेचा सर्वात जास्त फायदा झाला आहे.

महात्मा फुले योजनेवर सतत विचारले जाणारे प्रश्न :-

1. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

  • आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आणी वैद्यकीय कागदपत्रे आवश्यक असतात.

2. या योजनेतर्गत कोणत्या रुग्णालयात जावे लागेल ?

  • ही सेवा राज्यातील अनेक सरकारी आणी खासगी मान्यता प्राप्त रुग्णालयात उपलब्ध आहे.
  • या हॉस्पिटल ची अधिकृत यादी संकेतस्थलावर उपलब्ध आहे.

3. महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे ?

  • ही महाराष्ट्र सरकारची एक मोफत आरोग्य सेवा योजना आहे. जी गरीब आणी गरजू लोकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देते.