
PRADHANMANTRI GRAMIN DIGITAL SAKSHRTA ABHIYAN
PRADHANMANTRI GRAMIN DIGITAL ABHIYAN चा परिचय :-
PRADHANMANTRI GRAMIN DIGITAL SAKSHRTA ABHIYAN ही भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रम अंतर्गत सुरु केलेली योजना आहे. ही ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल साक्षर बनवण्याच्या उद्देश ने रबावली जात आहे. विशेषतः ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य साक्षर नाही, अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जातो. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट, ई – मेल, ऑनलाईन बँकिंग, डिजिटल payment प्रणाली, मोबाईल व्हॉइलेट, सायबर सुरक्षा संबंधित प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पुर्ण मोफत आहे. आणी 14 ते 60 वय असलेले ग्रामीण नागरिक यात सहभागी होऊ शकतात.
या योजनेच्या प्रभावी अमलाबजानवीसाठी सरकारने अनेक खाजगी व शासकीय प्रशिक्षण संस्थान्न मान्यता दिली असून, ते ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्रे चालवतात. या अभियानमुळे केवळ ग्रामीण नागरिकांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे हा हेतू नसून, डिजिटल सेवाचा उपयोग करून त्यांना स्वयंरोजगार आणी आर्थिक संधी निर्माण करण्यासाठी सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. ही योजना ग्रामीण व शहरी भागातील दरी कमी करण्यासाठी मदत करत आहे. आणी संपूर्ण भारताला डिजिटल अर्थव्यवस्था शी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. डिजिटल साक्षरता च्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सशक्तिकारण वाढत आहे. आणी त्यामुळे भारताचा डिजिटल परिवर्तनचा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे.
प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाची उद्दिष्टे :-
1. ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानाचे प्राथमिक ज्ञान देणे :-
- या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देणे. संगणक, स्मार्टफोन, इंटरनेट , डिजिटल payment या सारख्या तंत्रज्ञान उपयोग करण्यासाठी प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये त्यांना नव्या technology शी परिचित करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण द्वारे नागरिकांना सांगणक सुरु करणे, कागदपत्रे तयार करणे, ई- मेल वापरणे अशा मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. यामुळे भीती दूर होते. आणी त्यांचा वापर करण्याचा आत्मविश्वास वाढतो. डिजिटल तंत्रज्ञान च्या मदतीने लोकांच्या जीवन शैलीत सुधारणा होते आणी कमी सुलभ होतात.
2. संगणक, स्मार्टफोन आणी इंटरनेट चा योग्य वापर करण्यासाठी सक्षम करणे :-
- या योजना द्वारे ग्रामीण भागातील लोकांना संगणक आणी स्मार्टफोन चा योग्य वापर शिकवलं जातो. सरकारी सेवा, ऑनलाईन शिक्षण, आरोग्य सेवा या सारख्या सेवाचा प्रभावि पणे वापर करण्यासाठी लोकांना शिकवले जाते. ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल सुविधा वापरण्याचे स्वातंत्र्य आणी आत्मनिर्भरता मिळावी हा या योजनेचा हेतू आहे.
3. डिजिटल divide कमी करून ग्रामीण भारताला डिजिटल अर्थाव्यवस्था सोबत जोडणे :-
- या योजनेच्या माध्यमातून शहरी आणी ग्रामीण भागातील जी डिजिटल दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणी डिजिटल शिक्षण मिळाले तर ग्रामीण भागातील लोक ऑनलाईन सेवाचा उपयोग करू शकतात या मुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी मदत होते.
4. महिला आणी वंचित गटाना डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून सक्षम करणे :-
- या योजनेच्या माध्यमातून महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्या डिजिटल टेकनॉलॉजि चा वापर करून स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. ग्रामीण महिलांना ऑनलाईन विक्री, डिजिटल मार्केटिंग, इत्यादी स्किल्स चे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे महिला सशक्तिकरणाला चालना मिळते.
5. डिजिटल साखरतेच्या मदतीने ग्रामीण भागात रोजगार आणी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे :-
- या योजना अंतर्गत प्रशिक्षण घेतलेले लोक डिजिटल तंत्रज्ञान च्या मदतीने नवीन व्यवसाय सुरु करू शकतात. ऑनलाईन मार्केटिंग, social मीडिया, फ्रीलँसिन्ग, ऑनलाईन टायपिंग, आणी डेटा एन्ट्री सारख्या संधी ग्रामीण भागातील तरुणांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात.
6. ग्रामीण नागरिकांना डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यासाठी सक्षम करा करणे :-
- PRADHANMANTRI GRAMIN DIGITAL SAKSHRTA ABHIYAN च्या मदतीने ग्रामीण नागरिकांना घरबसल्या आर्थिक व्यवहार करण्यासाठी सक्षम केले जात आहे. बँकेत जाऊन पैसे काढण्याची गरज ण पडता मोबाईल व्यवहार करता येण्याच्या सुविधा द्वारे मार्गदर्शन केले जाते. यामुळे आर्थिक साक्षरता वाढते आणी व्यवहार अधिक पारदर्शक आणी सुरक्षित होतात.
7. सायबर सुरक्षा आणी सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता वाढवणे :-
- इंटरनेट वापरताना होणाऱ्या फसवणूकपासून वाचण्यासाठी सायबर सुरक्षा महत्वाचे आहे. या योजना अंतर्गत लोकांनां पासवर्ड सुरक्षा, फिसिंग अटॅक, otp फसवणूक, ऑनलाईन फसवणूक, या बाबत मार्गदर्शन केले जाते. या मध्ये लोकांना शिकवले जाते कि अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नये आणी कोणतेही संकेतष्ठल सुरक्षित आहेत याची तपासणी कशी करावी.
समग्र शिक्षा अभियानाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Table of Contents
प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान चे फायदे :-
1. ग्रामीण भागात डिजिटल सक्षरता वाढते:-
- या योजना मुळे नागरिक संगणक, स्मार्टफोन, आणी इंटरनेट चा योग्य वापर शिकतात. ज्यामुळे त्यांचा दैनंदिन जीवनात टेकनॉलॉजि चा प्रभावी उपयोग होतो.
2. संपूर्ण ग्रामीण अर्थाव्यवस्था चा विकास :-
- डिजिटल टेकनॉलॉजि चा प्रभावी वापार केल्यास ग्रामीण भागात नवीन आर्थिक संधी निर्माण होतात, व त्यामुळे रोजगार निर्माण होऊन एक प्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्था ला मदत होते.
3. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढते:-
- नागरिकांना ऑनलाईन फसवणूक, पासवर्ड सुरक्षा, आणी सुरक्षित इंटरनेट ब्राऊसिंग या बाबत माहिती दिली जाते, ज्यामुळे सायबर गुन्हा पासून संरक्षण मिळते.
4. महिला आणी वंचित गटाचे संरक्षण :-
- या मुळे महिलांना ऑनलाईन व्यबासाय, डिजिटल मार्केटिंग आणी आर्थिक व्यवहार करण्याचे प्रशिक्षण दिल्याने त्यांना अधिक स्वयंपूर्ण बनबता येते.
5. शिक्षण आणी कौशल्य विकासाला चालना :-
- ऑनलाईन शिक्षण, व्हिडिओ lecture आणी डिजिटल अभ्यासक्रमांचा उपयोग करून विद्यार्थी आणी नागरिक नवीन कौशल्य आत्मसात करू शकतात.
प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाचे निष्कर्ष :- ही योजना ग्रामीम भागातील नागरिकांना डिजिटल टेकनॉलॉजि सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजमेच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईल, संगणक, इंटरनेट यांचा वापार योग्य प्रकारे कसा करावा हे शिकवले जाते. डिजिटल कौशल्या असेल तर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. महिला आणी वंचित गटाना प्रशिक्षण दिले जाते. या मुळे ग्रामीण भागाचा विकास खूप लवकर होते आहे. प्रधानमंत्री डिजिटल ग्रामीण विकास योजना ही एक भारताच्या डिजिटल भविष्याचया दिशेने एक महत्वाचे टपपा आहे. जर आपल्या दैनंदिन व्यवहारात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास भारत खऱ्या अर्थाने डिजिटल महासत्ता बनू शकेल.
1. या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- अर्जसाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किव्हा अधिकृत प्रशिक्षण केंद्राला भेट दया. किव्हा अधिकृत वेबसाईट ला भेट दया.
2. प्रधानमंत्री डिजिटल ग्रामीण साक्षरता अभियाना अंतर्गत मिळणारे प्रमाणपत्र कुठे उपयुक्त ठरु शकते ?
- हे प्रमाणपत्र रोजगारच्या संधी साठी, सरकारी योजनाच्या लाभा साठी आणी डिजिटल सेवाचा वापार करण्यासाठी मदत करु शकते.
3. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर काही प्रमाण पत्र दिले जाते का ?
- होय, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची यशस्वी पूर्तता केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. जे नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन द्वारा मान्यता प्राप्त असते.
4. प्रशिक्षण कालावधी किती आहे ?
- साधारण 20 तासांचे प्रशिक्षण दिले जाते, जे काही आठवड्यात पूर्ण केले जाते.
5. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
- आधार कार्ड, पत्याचा पुरावा, वयोगटाचा पुरावा, आणी फोटो आवश्यक असतो.
6. या योजनेत कोण सहभागी होऊ शकतो ?
- ग्रामीण भागातील 14 ते 60 वयोगटातील नागरिक या योजनेत सहभाही होऊ शकतात. विशेषतः ज्या कुटुंबात एकही डिजिटल साक्षर व्यक्ती नाही.