SUKANYA SAMRIDDHI YOJNA |(सुकन्या समृद्धी योजना).

Sukanya Samriddhi Yojna.

Sukanya Samriddhi Yojna

SUKANYA SAMRIDDHI YOJNA : सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारद्वारे मुलींच्या भविष्यासाठी सुरु केलेली एक बचत योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या शैक्षणिक, आरोग्य, आणि लग्नाच्या खर्चासाठी वित्तीय सुरक्षा निर्माण करणे हे आहे. या योजनेला ‘बेटी बचाओ, ‘बेटी पढाओ ‘ योजनेशी संबंधित मानले जाते, ज्यात मुलींच्या अधिकारांना प्रोत्साहन दिले जाते.

  1. सुकन्या समृद्धी योजनेचा इतिहास :- SUKANYA SAMRIDDHI YOJNA 22 जानेवारी 2015 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. योजनेचा प्रमुख उद्देश मुलींचा भविष्यासाठी वित्तीय स्थर्य निर्माण करणे हा होता. योजनेत सरकारी बँका आणी पोस्ट ऑफिस चा माध्यमातून मुलींसाठी खाती उघडली जातात. या योजनेचा फायदा मुख्यता गरीब आणी माध्यमवर्गीय कुटुंबान्ना होतो.
  2. सुकन्या समृद्धी योजनेची मुख्य वैशिष्ट्य :- 1.सुरुवात करणे -> SUKANYA SAMRIDDHI YOJNA खाते मुलीच्या जन्माचा 10 व्या वर्षा पर्यंत उघडता येते. 2. खाते उघडण्याचे ठिकाण -> सरकारी बँक आणी पोस्ट येथे खाते उघडता येत. 3. बचत रक्कम -> खात्यात किमान ₹250 आणी जास्तीत जास्त ₹1,50,000 पर्यंत जमा करता येतात. 4 व्याज दर -> सुकन्या समृद्धी योजनेवर उच्च व्याज दर ( सुमारे 7.6% ते 8% ) मिळतो, जो साधारण कोणत्याही इतर बचत योजनेचा तुलनेत अधिक आहे. 5. कर सवलत -> या योजनेत कर सवलत मिळते. सद्यास्यांचा आयकर सूट 80च अंतर्गत प्राप्त होतो. 6. अर्ज -> खात्याची निवडक रक्कम वसुल केली जाऊ शकते, पण 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेदार मुलीला ही रक्कम मिळू शकते.
  3. सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे :- 1. वित्तीय सुरक्षा -> या योजनेमुळे मुलींचा भविष्याचे आर्थिक नियोजन शक्य होते. जसे शाळा, महाविद्यालय, तसेच आर्थिक मदत. 2. बचत योजना -> नियमितपणे लहान रक्कम गोळा करून मोठी रक्कम गोळा करता येते. 3. गुप्ताता -> या योजनेत खात्याची माहिती गुप्ता ठेवली जाते. खातेदारचा परवानगी शिवाय ही माहिती कोणालाही मिळू शकत नाही. 4. मोठा पारतावा -> इतर सरकारी योजना किव्हा बचत खात्याचा तुलनेत SUKANYA SAMRIDDHI YOJNA योजनेवर जास्त रिटर्न मिळतात.
  4. सुकन्या समृद्धी योजनेच्या नियम व अटी. 1. खाते खोलण्याची वयोमर्यादा 10 वर्षे असणे गरजेचे आहे. 2. या योजनेमध्ये खाते मुलीच्या पालक किव्हा कायदेशीर संरक्षकाचा वतीने उघडता येते. 3. कमीत कमी ₹250 आणी जास्तीत जास्त ₹1,50,000 या योजनेमध्ये जमा करता येते. 4. ह्या खात्याला password दिला जातो. आणी सुरक्षा राखली जाते.
  5. सुकन्या समृद्धी योजनचा वापर. 1. मुलींचा शालेय शिक्षणासाठी या योजनेची रक्कम खरंच केली जाऊ शकते. महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा खर्चासाठी SUKANYA SAMRIDDHI YOJNA योजनेतील रक्कम वापरली जाऊ शकते. तसेच मुलींचा विवाहसाठी ही रक्कम वापरली जाऊ शकते. तसेच काही आवश्यक खर्च जसे आरोग्य इत्यादी साठी ही रक्कम वपारली जाऊ शकते.
  6. सुकन्या समृद्धी योजनेची उपयुक्तता.- SUKANYA SAMRIDDHI YOJNA योजना जास्तीत जास्त लोकांना लाभकारी ठरते. याची लोकप्रियत्ता वाढत आहे, कारण ही एक शासकीय योजना आहे ज्यात जास्त व्याज दर दिला जातो. या योजनेच्या अटी व शर्ती एकदम सहज आणी स्पष्ट आहेत, त्यामुळे ती लोकांसाठी आकर्षक आहे. ज्या कुटुंबान्ना मुलींचा शिक्षणासाठी किवा लग्नासाठी पैशांची गरज आहे, त्यांना या योजनेचा चागला फायदा होतो. सरकारचा देखरेखी खाली ही योजना असल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणार आहेत त्यांचा साठी ही योजना अधिक सुरक्षित आहे.
  7. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक कशी करावी. – या साठी काही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. 1 आधार कार्ड 2 कुटुंबाचे राशन कार्ड 3. बँक पासबुक खाते उघडण्यासाठी आवश्यक आहे. 4. त्या संबंधित मुलीचे जन्म प्रमाण पत्र , ही सर्व कागदपत्रे खात उघडण्याचा ठिकानि सादर करणे आवश्यक आहे.
  8. या योजने बाबत तज्ञ् लोकांचे मत – वित्त तज्ज्ञचा असा सल्ला आहे कि, ही योजना एक उत्तम पर्याय आहे. जर आपल्याला दीर्घ गुंतवणूक करायची असेल तर, योजनेच्या किमान रकमेचा तुलनेत जो परतावा आहे तो खूप चांगला आहे. यात 18 वर्षा पर्यंत गुंतवणूक करू शकता आणी त्यानंतर रक्कम मिळवू शकता.
  9. सुकन्या समृद्धी योजनेच्या जोखमी :- SUKANYA SAMRIDDHI YOJNA मध्ये कोणत्याही मोठ्या अशा जोखमीचा समावेश नाही. ही एक सरकारी योजना आहे, त्यामुळे या योजनेला कोणताही धोखा नाही. तसेच, प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा फायदा घेणं योग्य असतो कि नाही याची नीट माहिती घेणं महत्वाचे आहे.

खाते ओपन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

  1. मुलीचं जन्म प्रमाणपत्र :- नगरपरिषद , ग्रामपंचायत किव्हा अधिकृत संस्थेचे.
  2. पालकांचे ओळखपत्र (कोणतेही एक) :- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग licence, मतदार ओळखपत्र.
  3. पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक ):- वीज बिल, टेलेफोन बिल, बँक स्टेटमेंट, आधार कार्ड.
  4. पासपोर्ट साईझ फोटो :- मुलीचं आणी पालकांचे.
  5. खाते ओपन करण्यासाठी अर्ज फॉर्म :- बँक किव्हा पोस्ट ऑफिस मधून मिळेल.

सुकन्या समृद्धी योजनेबाबत अजून सखोल माहिती.

1. खाते उघडण्याची वेळ व कालावधी. :- मुलगी 10 वर्षाची होईपर्यंत खाते उघडता येते. त्या खात्याचा टाइम 21 वर्ष आहे.

2. पैसे भरण्याचा कालावधी:- खाते उघडल्यापासून फक्त 15 वर्षे पैसे भरता येतात. बाकीचे 6 वर्षे खाते व्याजासह वाढत राहते.

3. मिळणारी रक्कम :- जर प्रत्येक वर्षे ₹1.5 लाख जमा केले तर 21 वर्षानंतर ₹65-75 लाख रक्कम जमा होऊ शकते. आणी शेवटी मिळणारी एकूण रक्कम करमुक्त असते. चक्रवढं पद्धतीने व्याज दिले जाते.

खाते बंद करण्याच्या काही अटी. ( premature closure )= काही विशेष परिस्तिथी मध्ये खाते बंद करता येते :-

  1. मुलीचा अकाली मृत्यू :- या परिस्थिती मध्ये जमा रक्कम व्याजासह मुलीच्या पालकांना दिली जाते.
  2. पालकांचा मृत्यू किंवा गंभीर आर्थिक संकट :- खातेदारकडून अर्ज सादर केल्यास पैसे काढण्याची परवानगी मिळते.
  3. मुलीचा अकाली विवाह :- मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नाचा वेळी खाते बंद करता येते.

अडचणीत खाते व्यवस्थापन :-

  1. यामध्ये कमी रक्कम ₹250 न भरल्यास ₹50 दंड आकारला जातो. तसेच थांबलेले खाते पुन्हा चालू करायचे असेल तर दंडाची पूर्ण रक्कम भरून खाते पुन्हा सुरु करता येते. तसेच खाते एका पोस्ट ऑफिस किव्हा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस किव्हा बँके मध्ये transfer केले जाऊ शकते.

व्याजदर बदल व अपडेट्स :-

सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदर व्याजदर सरकार दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन करते. खातेदाराला उघडलेल्या खात्याचा सुरुवातीपासून लागू व्याजदराचा फायदा होतो.

तुलना आणी सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे :-

  1. PPF आणी FD यांच्याशी तुलना केली असता, सुकन्या समृद्धी योजना अधिक सुरक्षित आहे. आणी चक्रवाड व्याजामुळे अधिक फायदा देते.
  2. 80c अंतर्गत कर सवलत मिळते. तसेच या योजनेमध्ये पूर्ण रक्कम कारमुक्ता आहे.
  3. मुलींच्या भविष्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. कारण यामध्ये मुलीच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी आर्थिक सुरक्षित्तेची हमी मिळते.
  4. ही योजना दीर्घाकालिन असल्याने एकत्रित रक्कम मोठ्या प्रकल्पसाठी ( उच्च शिक्षण, व्यवसाय किव्हा लग्नासाठी ) उपयुक्त आहे. आणी सरकार पुरस्कृत योजना असल्याने 100% सुरक्षित आहे.

मेक इन इंडिया योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

सुकन्या समृद्धी योजनेचा समाजावर परिणाम:-

  1. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पालकांना आर्थिक बळ मिळते.
  2. तसेच आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केल्यास लग्नाचा खर्चाची चिंता मिटते.
  3. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणी पालकांना मुलगी जन्माबाबत सकारात्मक चालना देण्यासाठी मदत होते.

आधिक माहिती व मदतीसाठी :-

  1. जवळच्या पोस्ट ऑफिस किव्हा राष्ट्रीय बँकेत संपर्क साधा.
  2. अधिकृत वेबसाईट : www.india.gov.in
  3. ग्राहक सेवा हेल्पलाईन : संबंधित बँक किव्हा पोस्ट ऑफिस कडून उपलब्ध.

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविषसाठी एक ठोस पाऊल आहे.

इतर राज्यांशी तुलना खालीलप्रमाणे आहे :-

महिलांच्या कल्यानासाठी महाराष्ट्रात योजना =

1 माझी कन्या भाग्यश्री योजना :- यामध्ये गरीब रेषेखाकील कुटुंबासाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेमध्ये थेट निधी दिला जातो. तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दीर्घाकालीन बचत फायदे आहेत.

2 राजस्थान : मुख्यमंत्री राजश्री योजना. = यामध्ये मुलीच्या जन्मनंतर आर्थिक मदत दिली जाते. सुकनन्या समृद्धी योजना दीर्घाकालीन बचतीवर केंद्रित आहे, तर ही योजना तातडीचा आर्थिक मदतिवर केंद्रित आहे.

3. उत्तर प्रदेश :- कन्या विद्याधान योजना :- या योजनेमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. SSY उच्च शिक्षणासाठी मोठी रक्कम देते, पण थेट निधी नाही.

4. कर्नाटक : भाग्य लक्ष्मी योजना:- मुलीच्या जन्मा नंतर विशिष्ट रकमेसह ठेव खाते उघडले जाते. भाग्य लक्ष्मी आणी SSY मध्ये संकल्पना सारखी आहे, पण SSY साठी पालकांना नियमिय योगदान द्यावे लागते.

उदाहरणं :- सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक आणी लाभ खालीलप्रमाणे आहेत.

गुंतवणूकीचा तपशील :-

  • दरवर्षी गुंतवणूक :- 1,00,000
  • कालावधी (15 वर्षे )
  • व्याजदर (7.6% समकालीन )
  • एकूण जमा रक्कम (परिपक्वतेंनंतर ) = 15,000,00

निष्कर्ष :-

Sukanya Samriddhi Yojna मुलींच्या भविष्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणी सुरक्षित योजना आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणी विवाहसाठी आवश्यक वित्तीय मदत मिळवून देणारी ही योजना कुटुंबासाठी एक आदर्श आहे. यामुळे मुलींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येऊ शकतात. SUKANYA SAMRIDDHI YOJNA ही मुलगी मोठी होई पर्यंत आर्थिक आधार देण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. यामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने बचतीने मुलीचे भविष्य सुरक्षित करता येते. जर तुम्हाला राज्यातील योजनं बरोबर suknya samriddhi फायदे निवडायचे असतील तर, मुलीच्या दीर्घाकालीन गरजनावर आधारित निर्णय घ्यावा.

Table of Contents